पालशेत नं. १ आदर्श प्रशालेत योग शिबीर संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देशात “७ एप्रिल” हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो.
याच दिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पालशेत नं. १ आदर्श प्रशालेत प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी व आरोग्य उपकेंद्र पालशेत यांच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पतंजली योग पिठाच्या प्रशिक्षिका अनुराधा दामले यांनी योगसाधनेच महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक धडे दिले, निरामय जीवनासाठी योग प्राणायाम अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. सदर प्रसंगी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षकबाबासाहेब राशिनकर यांनी तर आभार उपशिक्षक संतोष गावडे यांनी मानले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दर्शना समगिस्कर आरोग्य सेविका अंकिता पालकर मदतनीस विजया नाटेकर समुदाय आरोग्य अधिकारी विनायक साबळे आशा सेविका वृंदा विखारे व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिष चव्हाण उपाध्यक्ष प्रित पटेकर, सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व सर्व पालकांनी समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत.