Home मनोरंजनदेश विदेश शासनाने खाजगीकरणाचा घेतलेल्या निर्णया विरोधात लालबाग परेल विभागात निषेध रॅली

शासनाने खाजगीकरणाचा घेतलेल्या निर्णया विरोधात लालबाग परेल विभागात निषेध रॅली

Spread the love

शासनाने खाजगीकरणाचा घेतलेल्या निर्णया विरोधात लालबाग परेल विभागात निषेध रॅली

 


(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)


 

दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी लालबाग परेल विभागात पार पडलेल्या सदर रॅलीत बेरोजगार युवक युवती, सर्व सामान्य नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शासनाने १४ मार्च २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयाचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला.

शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता इत्यादी १३६ प्रकारची पदे बाह्य एजन्सिज मार्फत भरण्याचा निर्णय उद्योग, उर्जा आणि कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दिनांक १४ मार्च, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. यातील विविध पदे ही महिना २५०००/-, ५००००/- ते २०००००/- ( पंचविस हजार, पन्नास हजार ते दोन लाख पगाराची आहेत.) ही सर्व पदे भरण्याचे काँट्रॅक्ट (९) नऊ प्रायव्हेट कंपन्यांना पाच वर्षासाठी दिलेले आहे. महाराष्ट्र शासन अशाप्रकारे सरसकट खाजगीकरण, कंत्राटीकरण करून नागरिकांच्या सुरक्षित व सुयोग्य वेतनाचा अधिकार डावलून सर्व पैसा या कंपन्यांच्या हवाली करीत आहेत. असे सरसकट खाजगीकरण करण्याचा निर्णय शासनाच्या लोककल्याणाच्या धोरणाला काळीमा फासून आपल्या संपर्कातील भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरणारा आहे. सरकारच्या सरसकट खाजगीकरण, कंत्राटीकरण करण्याच्या निर्णयामुळे विविध प्रवर्गाचे आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला.

सदर निषेध आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या.

१) शासनाने बाह्य एजन्सिज द्वारा शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता इत्यादी १३६ प्रकारची पदे बाह्य एजन्सिस मार्फत भरण्याचा, खाजगीकरणाचा, कंत्राटीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
२) एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू करून सर्व भरती प्रक्रिया एम्प्लॉयमेंट एक्सचेंज द्वारेच करण्यात यावी.
३) शासकीय निमशासकीय व महामंडळे इत्यादी आस्थापनातील भरती ही विविध प्रवर्गाच्या आरक्षणानुसार शासनाच्या सेवेत करण्यात यावी.

सदर रॅली ची सुरुवात जिजामाता नगर काळाचौकी येथून करण्यात आली, “चटई चाळ श्रावण यशवंते चौक, दत्ताराम लाड मार्ग चिंचपोकळी लालबाग येथून निघून भारत माता चित्रपटगृहाच्या समोर समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये प्रितेश माजळकर आणि सुबोध मोरे यांनी क्रांती गीते गाऊन बेरोजगार युवकांमध्ये क्रांतीचे पर्व निर्माण केले. सदर रॅलीत भारतीय बेरोजगार संघाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, सरचिटणीस किरण गमरे, सचिव वैशाली मोहिते तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते मकरंद तासगावकर सहभागी झाले होते. त्यानी लालबाग- परळ मधील मिल कामगारांची परिस्थिती आणि आताचा बेरोजगार युवा यावर भाष्य केले. प्रदीप जाधव (बावीस प्रतिज्ञा अभियान प्रमुख ) प्रा. गजानन डोंगरे, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सरकारने सदर खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या उपाध्यक्षा दिपीका आग्रे यानी संघटनेच्या वतीने जाहिर केले. सदर आंदोलनाची सांगता भारतीय लोकसत्ता संघटनेचे अध्यक्ष अमोलकुमार बोधिराज यांनी गिरण गावातील बेरोजगार वर्गाची स्थिती आणि शासनाने घेतलेल्या खाजगीकरणाच्या कंत्राटीकरणाचा निर्णय युवकांच्या भविष्यासाठी किती घातक आहे हे स्पष्ट केले.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी अंकिता मोरे, कमलेश मोहिते, मयुरेश जंगम, पिलाजी कांबळे ,ऍड. रूपाली खळे, मनीष जाधव, सनी कांबळे, मंगेश खरात, योगेश कांबळे, अमित खैरे, स्वप्निल खळे, प्रतिक कदम, पूनम पवार, जबाबदारी पार पाढली.

Related Posts

Leave a Comment