“आपली मासोळी” ब्रँडचे रीलॉन्चिंग ठाण्यात संपन्न- अनेक मान्यवरांची उपस्थिती
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
आपली मासोळी ब्रँडचे रीलॉन्चिंग ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका आणि उत्तम वक्त्या सारिकाताई भोईटे- पवार आणि माईंड सेट कोच, लेखिका तृप्ती प्रधान यांची उपस्थिती लाभली.
महिलांची व्यावसायिक मानसिकता तयार व्हावी, आर्थिकसक्षम व्हावे, स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्याच सोबत कलाकार अंशुमन विचारे यांनीही कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शुभेच्छा दिल्या.
मासोळी ब्रँड आता फ्रेश फिश आणि चिकन मध्येही असणार आहे. तसेच जवळ जवळ १०- १२ फ्लेव्हर मध्ये तुम्हाला चव मिळणार आहे. नॉनव्हेज प्रेमींना पर्वणीच ठरणारा मासोळी ब्रँड चाहत्यांच्या पसंदीला येईल असा विश्वास मासोळी च्या संचालिका निलाक्षी भोईर यांनी दिला आहे.
या कार्यक्रमाला मासोळी ब्रँड चे चाहते तसेच अनेक मार्गदर्शक याठिकाणी उपस्थित होते. प्रताप पाटील, बळीराम भोईर, चंद्रकांत जगताप, चेतन काळे, स्नेहा आंब्रे, ज्योती चिदंनकर, संजीवनी काळे, अर्पित कांबळे, सिद्धार्थ नागरले, तृप्ती रसाळ, त्नमय भोईर, विवेक काबाडी, महेश नाडकर्णी, डॉ. कुन्नूर, डॉ. सुमन पारेख हे मान्यवर उपस्थित होते.