Home शैक्षणिक कोकण सुपुत्र दशरथ कदम एन. ए. बी संस्थेच्या राज्यस्तरीय “आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार २०२३” ने सन्मानित 

कोकण सुपुत्र दशरथ कदम एन. ए. बी संस्थेच्या राज्यस्तरीय “आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार २०२३” ने सन्मानित 

Spread the love

कोकण सुपुत्र दशरथ कदम एन. ए. बी संस्थेच्या राज्यस्तरीय “आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार २०२३” ने सन्मानित 

 


(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर/ उदय दणदणे)


 

नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड ( NAB ) संस्थेच्या वतीने गेल्या ३८ वर्षापासून दिव्यांग बालके, तरूण – तरुणी, नागरिक यांच्या शिक्षण, स्वयंरोजगार, नोकरी व्यवसाय व आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्थेच्या या गौरवशाली वाटचालीत आपले योगदान देणारे व निस्वार्थ कार्यरत असणारे शिक्षक, प्राध्यापक व सेवाभावी संस्था व व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी गेल्या २५ वर्षापासून उपरोक्त संस्थेच्या वतीने “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण” सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड (NAB) युनिट महारष्ट्र नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा २०२२/ २३ चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक २५ मार्च – २०२३ रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड चिपळूणचे अध्यक्ष सूचय शेठ रेडीज, कार्यवाह निलेश भुरण, जनसंपर्क अधिकारी संदिप नलावड़े यांच्या मार्गदर्शना खाली दिव्यांग बालके यांचे शिक्षणासाठी व त्यांना मिळणाऱ्या विविध सोई सुविधांसाठी सदैव कार्यरत असणारे, नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड (चिपळूण) च्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणारे, समाजशील, उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय उच्च विद्याविभूषित असे रत्नागिरी, गुहागर तालुक्यातून जि. प. शाळा मुंढर न. १ चे पदवीधर शिक्षक दशरथ पांडूरंग कदम यांचा दृष्टी बाधित विशेष शिक्षक म्हणून प्रस्ताव पुरस्कार समिती कड़े पाठविण्यात आला होता.

पुरस्कार निवड समितीने संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर दशरथ कदम सर यांच्या कार्याची दखल घेऊन २०२२/ २३ चा दृष्टी बाधित “आदर्श विशेष शिक्षक पुरकार- २०२३” नाशिक येथे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक, शाल, श्रीफळ व धनादेश देऊन प्रदान करण्यात आला.

त्याचबरोबर दृष्टी बाधित विद्यार्थी वाहिब कडवडकर, मनीषा खिल्लारे बारावी पास, सर्वेश पवार, नंदिनी बेंडूक, दहावी- पास यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गुहागर तालुक्यातील गिमवी गावचे सुपुत्र दशरथ पांडुरंग कदम शिक्षण M. A. M. E.D पदवीधर शिक्षक असून जि. प. शाळा मुंढर न.१ येथे आपल्या शैक्षणिक सेवेत गेली २८ वर्षे कार्यरत आहेत. दिव्यांग बालकांच्या शिक्षणासाठी व त्यांना मिळणाऱ्या विविध सोई सुविधा प्रामुख्याने त्यात मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, ब्रेल लिपी बुकसाठी कायम प्रयत्नशील असतात. दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे साठी वरिष्ठांची मदत आणि मार्गदर्शन घेत “नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड” साठी ध्वज निधी (अंध निधी) गोळा करणे, चिपळूण NAB च्या विविध उपक्रमात सहभागी होत मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी रुग्णांना आवश्यक ते सर्व सहकार्य, मधुमेह रुग्णाच्या डोळ्यांची निगा घेणे संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच तरुण व जेष्ठ अंध दिव्यांगासाठी गॉगल, स्टिक, उपलब्ध करणे, रोजगारासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे, सर्व सामान्य शाळेतील मुलांसाठी खेळ व योगासने चे मार्गदर्शन तसेच विज्ञान प्रदर्शन मध्ये तालुका स्तरापर्यंत यशस्वी सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन तसेच गुहागर तालुका बालरक्षक समन्वयक म्हणून ते कायम स्वरूपी कार्यरत आहेत.

दशरथ कदम यांना आजवर समाजभूषण, टेक्नो टीचर, दिव्यांग मित्र, समृद्ध शिक्षक मंच, दिव्यांग भूषण असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये त्यांना गिमवी गावातील मित्र परिवार व मुंढर गावातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत असते असे दशरथ कदम आवर्जून सांगतात. नॅशनल असोशियन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श विशेष शिक्षक पुरस्कार २०२३ प्राप्त झाल्याबद्दल दशरथ कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदनसह कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment