Home साहित्य ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अविनाश ठाकूर “महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३” ने सन्मानित

ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अविनाश ठाकूर “महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३” ने सन्मानित

Spread the love

ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अविनाश ठाकूर “महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३” ने सन्मानित

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)


 

जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ मुंबई तर्फे मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबाबत मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३चे मुंबई पत्रकार संघ, पत्रकार भवन मुंबई येथे दिनांक २५ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते.

डोंबिवली (ठाणे) सांस्कृतिक व शैक्षणिक नगरीचे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश एस. ठाकूर, डोंबिवली यांना मानाचा “महाराष्ट्र मराठी भूषण पुरस्कार २०२३ मा. संभाजीराजे जाधव (मा. राजमाता जिजाऊ साहेब यांचे माहेरचे १४ वे वंशज), मराठी सिनेअभिनेत्री अमृता उत्तरवार (बाळूमामा सिरीयल फेम), मा. अभिजित राणे (कामगार नेते व संपादक दैनिक मुंबई मित्र), मा. चारुशीला देशमुख (अध्यक्षा कै. शिवाजीराव देशमुख सामाजिक संस्था, नाशिक), मा. सूरज भोईर (ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते) व इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मराठी साहित्य क्षेत्रातात करत असलेल्या विशेष व उल्लेखनीय कार्याचा, सेवेचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार्थी सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर यांच्यावर सर्व साहित्य स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Posts

Leave a Comment