Home सामाजिक “दै. गुहागर सत्ता” चे संपादक राजेंद्र मांडवकर आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित

“दै. गुहागर सत्ता” चे संपादक राजेंद्र मांडवकर आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित

Spread the love

“दै. गुहागर सत्ता” चे संपादक राजेंद्र मांडवकर आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित

 


(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)


 

दै. गुहागर सत्ता पत्रकार, वाचकांसाठी जणू आनंदोत्सव साजरा व्हावा असा हा क्षण

कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर (इंगळी) ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आयोजित “१३ वे” राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कोकण सुपुत्र, “दैनिक गुहागर सत्ता” चे संपादक राजेंद्र मांडवकर यांना आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले असून सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हे साहित्य संमेलन रविवारी दिनांक ५ मार्च २०२३ रोजी कुमार विद्यामंदिर इंगळी येथील भव्य मैदानात पार पडले.

गेली ३३ वर्ष पत्रकारिता क्षेत्रात अभिमानास्पद कार्यरत असलेले राजेंद्र मांडवकर यांनी आजवर विविध साप्ताहिक, मासिक, दैनिकांत प्रामुख्याने दैनिक सागर, दैनिक लोकसत्ता वृत्तपत्र समुहात आर्टिस्ट म्हणून काम पाहिले आहे. आज ते स्वतः जनसामान्यांचा आवाज “दैनिक गुहागर सत्ता” चे मुख्य संपादक म्हणून सक्षम धुरा सांभाळत दैनिक गुहागर सत्तातून महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक घटनेचा कानोसा घेत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो. समाजातील अन्यायकारक घटना असो अथवा प्रशासकीय सेवेतील गळताण कारभार, व चालू घडामोडींवर ते वास्तवदर्शी संपादकीय मांडून रोखठोक असा खरपुस समाचार घेत असतात.

 

 

डिजिटल असणारे दैनिक गुहागर सत्ता वृत्तपत्रातुन गुहागर तालुका सह महाराष्ट्रातील विविध भागांतील बातम्यांचा अचूक वेध तसेच प्रासंगिक लेख ही दैनिक गुहागर सत्ताची विशेष ओळख होय. आणि म्हणूनच “दैनिक गुहागर सत्ता” वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणारे संपादक राजेंद्र मांडवकर यांनी आपल्या दैनिक गुहागर सत्तातून समाजातील घडामोडींचा लेखा जोग मांडून तळागाळातील सर्वसामान्यांच्या समस्यांना न्याय देण्या बरोबरच वृत्तपत्राच्या माध्यमातून उल्लेखनीय समाज जनजागृतीचे काम यशस्वी करीत असल्याबद्दल उपरोक्त संस्थेच्या वतीने दैनिक गुहागर सत्ताचे मुख्य संपादक राजेंद्र मांडवकर यांना आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजातील विविध घटकांतून त्यांचे अभिनंदनसह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Posts

Leave a Comment