अंधेरी येथे रेणुका एस बी एस हाँस्पिटल मध्ये ब्लड स्टोरेजचे उदघाटन संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
अंधेरी येथील प्रसिद्ध हाँस्पिटल रेणुका एस बी एस याठिकाणी नुकतेच ब्लड स्टोरेज सेटरचे मा. श्रीमती रंजना ताई पाटील, वैभव बोराडे, अभिनव खुरदिया, अमोल जाधव राव जादाब मंडळ या मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. श्री. ऍड. रविद्र भोसले यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्सोवा विधानसभा आमदार डाँ. भारती ताई लवेकर, शशी भुषण शर्मा नगरसेवक श्रीमती रंजना ताई पाटील श्री वैभव बोराडे तसेच कार्यक्रमाला डाँ. सनिल खोपकर डाँ. अनिरुध्द पालांडे, जादंब मण्डल सी. ए. अभिनव सुरदिया अमोल जाधव राव स्मिता जाधव सम्जुक्ता मोकाशी राव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुका एसबीएस हाँस्पिटलचे ट्रस्टी श्री. अनिल चव्हाण, श्री. मंगेश सावंत श्री. प्रशांत जाधव श्री. गजानन सोनकांबळे श्री. दिपक बदिवाडेकर यांनी मेहनत घेतली