Home सामाजिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे मोफत कायदेविषयक शिबिर संपन्न 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे मोफत कायदेविषयक शिबिर संपन्न 

Spread the love

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे मोफत कायदेविषयक शिबिर संपन्न 

 


(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

स्थानिक वाशीम येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे मराठी सवर्धनदिना निमित्त दिनांक २७/०२/२०२३ रोजी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर विधाता भवन, वाशीम येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मंचावर व्ही. ए. टेकवानी साहेब (सचिव व न्यायाधिष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशीम), जे. एल. मानवतकर विधी स्वयंसेवक (वक्ते माहिती अधिकार २००५ ), ॲड. शुभांगी खडसे (टेली वकील), प्रभू कांबळे (विधी स्वयंसेवक) हे उपस्थित होते.

टेकवानी साहेबांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तर प्रमुख वक्ते म्हणून जे. एल. मानवतकर यांनी माहिती अधिकार 2005 या विषयी महिलान मोलाचे मार्गदर्शन केले. तर ॲड. शुभांगी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा 2005 याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक संजय भुरे, दीपक देशमाने, गणेश गायकवाड, विवेक पाचपिले, अनिल देशमुख, मोतीराम खडसे शिवाजी चाबुस्कवार, अंकुश चव्हाण, माधव डोंगरदीवे, धम्मपाल टाले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन राजकुमार पडघान यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी अवताडे यांनी केले.

Related Posts

Leave a Comment