सांजवातच्या ऑडिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी दिली विशेष भेट
ओम शिवम फिल्म्स अँड प्रोडक्शन मयूर खेतले निर्मित सांजवत चित्रपटाचे ऑडिशन उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी जिल्ह्यातील अनेक कलाकार यांनी आपली कला सादर केली. तर अभिनेता निखिल राजेशिर्के यांनी विशेष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
चिपळूणच्या राजकारणावर चित्रपट काढावा अशी इच्छा माजी नगराध्यक्ष सुरेखाताई खराडे यांनी व्यक्त केली. यावेळी चिपळूण माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, दिग्दर्शक मिलिंद कांबळे, पटकथाकार रवी खैरे, वेशभूषाकार सावंत, कॅमेरा मन दत्तप्रसाद गावडे, मुंढे गावचे तंटामुक्त अध्यक्ष राज खेतले, दैनिक सागर उपसंपादक सुभाष कदम, निर्माता मयुर खेतले, जेष्ठ पत्रकार सतीश कदम, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे, अमीर कुटरेकर, मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, मुख्याध्यापक दीपक शिंदे, जेष्ठ गायक श्रीराम पवार, जेष्ठ अभिनेते दीपक खेतले, छोटू कोलगे, जय महाराष्ट्र चॅनल जिल्हा प्रतिनिधी राजेश जाधव, सती हायस्कूलचे मुख्याध्यापक वरेकर, मुंढे ग्रामपंचायत सदस्य श्याम खेतले, विश्वनाथ कदम, सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निर्माता मयूर खेतले, प्रोडक्शन व्यवस्थापक दीपक शिंदे, लेखक निसार शेख आणि श्रीराम पवार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निर्माता मयुर खेतले यांनी प्रास्तविक मधून ओम शिवम फिल्म्स अँड प्रोडक्शन हाऊस ची निर्मिती करण्याचा उद्देश सांगितला. तसेच सांजवात चित्रपटाची निर्मित कशी झाली याबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा ताई दाभोळकर यांनी निर्माता मयूर खेतले यांना शुभेच्छा देत हा चित्रपट नक्कीच पारितोषिक मिळविले अशी शुभकामना दिली.
चिपळूणच्या राजकारणावर चित्रपट काढावा- सुरेखा खेराडे
माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर सारखे कलाकार कोकणच्या मातीत घडावे त्याचबरोबर निर्माता म्हणून मयूर खेतले पाऊल टाकत आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत पण चित्रपटाचे लेखक निसार शेख यांनी आता पर्यंत दोन फिल्म केल्या असून त्यांना चिपळूणच्या राजकारणाचा भौगोलिकृष्ट्या अभ्यास आहे त्यामुळे निसार शेख यांनी चिपळूणच्या राजकारणावर चित्रपट काढावा आपण त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आ शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त निर्माता मयुर खेतले यांनी अभिनेता निखिल राजे शिर्के यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सांजवातच्या टीमने अथक परिश्रम घेतले..