निंगणुर सर्कल मध्ये पंचायत समिती उपसभापती विशाखा जाधव यांच्या नावाची चर्चा
(दिशा महाराष्ट्राची/ उमरखेड- लखन जाधव)
मागील पंचवार्षिक मध्ये उमरखेड पंचायत समिती उपसभापती विशाखा जाधव यांनी सर्कल मधील रस्ते पाणी आरोग्य साठी सर्कल मध्ये विकास काम केल्यामुळे सर्कल मध्ये विशाखा शंकर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सर्कल मधील कुरली वाडी चिखली भवानी टेंबुरदरा निंगणुर मेट या सर्कल मधील अनेक गावात विकास काम केल्यामुळे निराधार महिला अपंग यासाठी सर्कल मध्ये सामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या महिला नेत्या म्हणून विशाखा जाधव आहेत. त्यामुळे निंगणुर सर्कल मध्ये विशाखा जाधव यांच्या नावाच्या चर्चा चालू आहे.
प्रतिनिधींजवळ बोलताना उपसभापती विशाखा जाधव यांनी सांगितले या भागातील विकास कामाला गती मिळावी यासाठी निंगणुर सर्कल मध्ये उतरणार आहे.