धैर्यशील पाटील यांनी शेकापला अखेरचा सलाम देत भाजपमध्ये केला पक्षप्रवेश
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
पेण मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यशील पाटील यांचा पक्षप्रवेश केला.
भाजपाची ताकद वाढत असताना माजी आमदार धैर्यशील पाटील यांशनी सुद्धा भाजपमध्ये सहभागी व्हावे, अशा प्रकारची शिष्टाई भाजपच्या नेत्यांनी केली. प्रामुख्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामी पुढाकार घेत पक्ष नेतृत्व आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यात समन्वय साधला आणि पाटील भाजपमध्ये दाखल झाले.