अक्षराअक्षरात शोधा ईश्वर: डाॅ. मधुसूदन घाणेकर
(दिशा महाराष्ट्राची/ गोवा)
“ईश्वरास प्रसन्न करुन घेण्याकरीता साधक नामाचा जप करतो. कुणी स्तोत्र मंत्र म्हणते तर कुणी आरती करते, प्रार्थना म्हणते तर प्रतिभावंत कवन रचतो. या सर्वाचे मूळ आहे अक्षर. अक्षर हे ईश्वराच्या जाऊन पोचण्याचे माध्यम आहे. त्यासाठी मनाच्या एकाग्रतेतून ईश्वर भक्ती आवश्यक असते “असे प्रतिपादन डाॅ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठाचे संस्थापक, अध्यक्ष आणि दत्तोपासक, पहिल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित कवयित्रींच्या ऑनलाईन काव्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी केले.
जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल पोएटेस संस्थेतर्फे 6 मराठी कवयित्रींना डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ‘इंटरनॅशनल पोएटेस ॲवाॅर्ड फाॅर स्पिरिच्युअल पोएट्री2023’ ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. घाणेकर बोलत होते. वसुधा नाईक, प्रतिमा काळे, गीतांजली वाणी, सारिका सासवडे, प्रिया दामले आणि आम्रपाली धेंडे या मराठी कवयित्रींना सदर आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.
भक्तीकाव्याविषयी भाष्य करताना डाॅ. मधुसूदन घाणेकर म्हणाले,
अंतर्मनाच्या गाभा-यातून
शोधत रहावे अक्षर अक्षर !
अक्षरातील गुंफता काव्यसुमन
प्रसन्न करुन घ्यावा ईश्वर !!