Home शैक्षणिक न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Spread the love

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

 


(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ७:३० वा. मराठी राजभाषा दिन,ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन तसेच महाराष्ट्र राज्य गीत गायन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार सर यांनी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री रत्नाकर आग्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण तसेच उपस्थित पालक व शिक्षक वृंद यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनीनी उपस्थित मान्यवर, पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामुदायिक राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र राज्य गीत गायन करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, संविधान उद्देशिका, प्रार्थना असा संपूर्ण परिपाठ संगीत साथीने पार पडला. यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री श्रीनाथ कुळे, श्री संदेश देवरुखकर,श्री ओंकार पुनस्कर, श्री प्रविण केळस्कर यांनी परिश्रम घेतले. प्रशालेतील मराठी विषय शिक्षक श्री सुधाकर गवळी यांनी प्रास्ताविक भाषणात आजच्या दिवसाचे महत्त्व विशद केले. जेष्ठ शिक्षक श्री पोपट साळुंके यांनी मराठी राजभाषा दिन तसेच साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्या नंतर संचालक श्री. रत्नाकर आग्रे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण यांनी तळवली डावलवाडी तर्फे सुमारे १५००/- किमतीची ऐतिहासिक विषयावरील मौलिक पुस्तके प्रशालेच्या ग्रंथालयासाठी देणगी दिली. मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार सर यांनी या बद्दल देणगीदारांचे तसेच अन्य मान्यवर, पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. तसेच मराठी राजभाषेचा गौरव करणारी एक स्वरचित कविता सादर केली.

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री श्रीनाथ कुळे सर यांनी सुंदर फलक लेखन केले होते. तसेच त्यांनी सुंदर सूत्रसंचालनही केले. जेष्ठ शिक्षक श्री संदेश देवरुखकर यांनी आभाराने कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Posts

Leave a Comment