मनोज पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुञ शिक्षक व सामाजिक कार्येकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलनात कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा क्रातीज्योती सावित्री बाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार वांद्रे- मुंबई येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या शानदार शासकिय कार्यक्रमात पर्यटन व महीला बालकविकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला.
सन्मानपञ सन्मानचिन्ह व रोख एक लाख अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी शिक्षक आमदार कपिल पाटील शालेय शिक्षण विभागाचे सचिव रनजितसिह देवोल आदी मान्यवर उपस्थित होते.