आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
24 फेब्रुवारी 2023 रोजी आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या सौ अंजली हडवळे, शैला मराठे, सुजाता देठे, मनीषा सूर्यवंशी, मंगल वाघ तसेच दिव्यामधून समाजसेविका उषा मुंडे तसेच आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत तसेच विद्या जाधव आणि दिवा शहराध्यक्ष शीला त्रिभुवने आणि त्यांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मीचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. अंजली मॅडमनी महिलांसाठी मार्गदर्शनपर गीत गायले. त्याचबरोबर महिलांचे हक्क अधिकार तसेच बॅड टच आणि गुड टच याबाबतीत खूप छान मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुजाता देठे मॅडमचे महिलांना खूप छान प्रकारे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर त्यांच्याकडून महिलांच्या व्यवसायासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. त्याबद्दल सर्व महिलांच्या माध्यमातून त्यांचे धन्यवाद मानले गेले.
शैला मराठी मॅडमनी आणि मंगल ताई वाघ यांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले तसेच मंगलताई वाघ यांच्या माध्यमातून महिलांना व्यक्तिमत्व विकास व्यवसायाची सुरुवात कशी करायची त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तसेच उद्धव आधार मार्गदर्शन यूट्यूब चैनल कसे ओपन करणे सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात कशी करणे इत्यादींच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींचा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे अशा बऱ्याच प्रकारे महिलांना या प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली.
सपना रोशन भगत यांनी ही महिलांना बऱ्याचशा गोष्टीत खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले नंतर महिलांना दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी व्यवसाय प्रशिक्षणाचे शिबिर आयोजित करून अगरबत्ती बनवणे आणि साबण बनवणे याचे प्रशिक्षण दिलं होतं त्याचे प्रमाणपत्र वाटप सुद्धा केले महिलांनी खूप छान पद्धतीने सहभाग आणि प्रतिक्रिया दिल्या लवकरच आरंभ सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष सुवर्णाताई कदम यांच्या माध्यमातून महिलांना कच्चामाल देऊन व्यवसायाचे सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहे तरी ज्या गरजू महिला आहेत त्यांनी सुद्धा या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.