Home साहित्य म मराठीचा- मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी बाल साहित्यसंमेलनाचे आयोजन

म मराठीचा- मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी बाल साहित्यसंमेलनाचे आयोजन

Spread the love

म मराठीचा- मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी बाल साहित्यसंमेलनाचे आयोजन

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)


 

मराठी भाषादिनाचे औचित्यसाधून साहित्यसंपदा तर्फे मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिवर्तन शिक्षण संस्थेचे ज्ञानामृत विद्यालय अंबरनाथ आणि नूतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कल्याण ह्यांच्या सहयोगातून सदर संमेलन ज्ञानामृत विद्यालय येथे दिनांक २७ फेब्रुवारी२३ रोजी पार पडणार आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड ह्यांची निवड संमेलनाध्यक्ष म्हणून करण्यात आली असून कवयित्री लेखिका बालसाहित्यिक ज्योती कपिले उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुलांमध्ये मराठीची गोडी निर्माण व्हावी आणि मुलांना मराठी साहित्य आणि साहित्यिकांची ओळख व्हावी या हेतूंनी मराठी बालसाहित्य संमेलनाची कल्पना आपण राबवित आहोत असे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी सांगितले. बालसाहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा नुकताच संमेलन कार्याध्यक्ष किसान वराडे ह्यांनी एका बैठकीत घेतला. सदर बैठकीत स्वागताध्यक्ष लक्ष्मण वराडे,समन्वयक विजय राणे, अस्मिता सावंत, कुंदा झोपे, मालती वराडे आणि शाळेतील इतर शिक्षक उपस्थित होते. संमेलनास प्रमुख निमंत्रित म्हणून डॉ योगेश जोशी (अध्यक्ष अक्षरमंच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान), नामवंत कवियत्री लेखिका प्रतिभा सराफ लाभणार आहेत.

संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने होणार असून पुढे आम्ही चालवू मराठी संवर्धनाचा वारसा असा संदेश उपस्थित मुलांकडून माध्यमातून देण्यात येणार आहे. काव्यवाचन आणि कथाकथन सत्रांचे आयोजन सदर संमेलनात करण्यात आले आहे. मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या साहित्यिकांची ओळख मुलांना व्हावी म्हणून निवडक साहित्यिकांच्या नावे स्वतंत्र कश असणार आहेत. मुलांना आपल्या रचना तिथे सादर करता येतील असे कळविण्यात आले आहे.

संमेलनाची विशेष बाब म्हणजे, बोली भाषांची ओळख मुलांना व्हावी म्हणून बोली भाषांतून परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. मालवणी, लेवागण बोली, आगरी कोळी आणि सातारा कोल्हापूर विभागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषांचे परिसंवाद येथे पार पडणार आहेत.

मराठी भाषेसाठी सातत्याने काम करून भरीव योगदान देणाऱ्या काही निवडक संस्थांचा, व्यक्तींचा सन्मान सुद्धा पार पडणार असून काही निवडक पुस्तकांना पुस्तक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

मुलांना लेखकांशी व कवींशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार असून आपण सुद्धा लिहू शकतो हा आत्मविश्वास मराठी बाल साहित्य संमेलनाच्या रूपाने निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Posts

Leave a Comment