Home साहित्य प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षि पुरस्कार जाहीर

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षि पुरस्कार जाहीर

Spread the love

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षि पुरस्कार जाहीर

 


(दिशा महाराष्ट्राची//नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

मराठबोली संस्था पुणे यांच्या अठराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना विविध पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

यात खरे- ढेरे- भोसले महाविद्यालय गुहागर चे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना त्यांच्या एकूण साहित्य सेवेसाठी ज्ञानमहर्षि हा सन्मानाचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड यांनी जाहीर केला आहे. यापुर्वी हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, गझलकार रमन रणदिवे यांना प्रदान करण्यात आला आहे.

डाँ बाळासाहेब लबडे हे दीर्घकाळापासून उत्तम अध्यापन करून शिक्षक म्हणून नाव लौकीक मिळवत आहेत. तसेच समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार, संशोधक, संपादक, साहित्य चळवळीचे मानकरी, नामवंत वक्ते, अनेक राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितामनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता असे कार्यक्रम सादर करणारे तसेच पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या २३ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ५ विद्यार्थ्यी संशोधन करीत आहेत. त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील “पिपिलिका मुक्तिधाम” सारख्या कादंबरीचे लेखन, नामदेव ढसाळ,नारायण सुर्व यांच्या नंतर मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा “मुंबई बंबई बाँम्बे” कवितासंग्रह, चित्रे कोलटकर यांच्यानंतर “महाद्वार” सारखा मराठी कवितेत मैलाचा दगड ठरलेला कविता संग्रह, मराठी कादंबरीतील पहिल्या रांगेतील ठरलेली अनोखी” शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी. “१९९० नंतरची थीम कविता” हे संपादन मराठील पहिले प्रायोगिक संपादन, “एक कैफियत” सारखा भन्नाट गझल संग्रह, ब्लाटेंटिया सारखा थीम कवितासंग्रह, “वाटर स्टोरिज” या सनस्टोन प्रकाशन अमेरिका, प्रकाशित पुस्तकातुन त्यांच्या दोन कथा कँनडा, युरोप, जर्मनी सह जगभरातील ग्रंथालयात पोहचल्या आहेत.

” शिष्यवृत्ती”, “नौटंकी” या आगामी चित्रपटासाठी त्यांची गाणी आहेत. मराठीतील दिग्गज समीक्षक रत्नाकर मतकरी, डाँ. नागनाथ कोत्तापल्ले, डाँ रावसाहेब कसबे, डाँ आनंद पाटील, डाँ. लुलेकर, लक्ष्मीकांत देशमुख, ए. के. शेख, डाँ. सांगोलेकर आदींनी त्यांची दखल घेऊन त्यांचे स्थान अधोरेखन मराठी साहित्यात केले आहे. या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुकासह अभिनंदन केले जात आहे.

Related Posts

Leave a Comment