दापोलीतील पिसई येथे RPI जिल्हाध्यक्ष प्रितम रुके यांच्या हस्ते धम्म स्तंभाचे उद्घाटन
(दिशा महाराष्ट्राची / दापोली)
मौजो गाव पिसई ता. दापोली जि. रत्नागिरी येथे धम्म स्तंभाचे उद्घाटन आर. पी. आय. जिल्हा अध्यक्ष प्रितमजी रूके यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दापोली विधान क्षेत्र अध्यक्ष अनिल जाधव, अजित तांबे, सरचिटणी दिनेश रूके, युवक अध्यक्ष जितेंद्र जाधव, पिसई गावचे सरपंच वसंत येसरे, ऊपसरपंच मनिषाताई घोले इत्यादी उपस्थित होते.
राहूल रूके यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विजय रूके, ऍड. अक्षय जाधव, व पिसई येथील वाडीतील सर्व सभासद, पदाधिकारी, महीला मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास आवर्जून उपस्थितीत होते.