मंडणगड तालुका तायकवाँडो अकॅडमी मधील सहप्रशिक्षक तृषाली चव्हाण यांची राष्ट्रीय स्पर्धेकरीता पंच म्हणून नियुक्ती
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा 24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन सलग्न मंडणगड तालुका तायक्वांडो अकॅडमी येतील प्रशिक्षण वर्गातील राष्ट्रीय पंच तृषाली चव्हाण यांची नियुक्ती झाल्या बाबत तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी परिपत्रकाद्वारे जिल्हा संघटना यांना कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून तृषाली चव्हाण व तेजकुमार लोखंडे या दोघाची निवड झाल्याने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ .अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई), धुळीचंद मेश्राम (गोंदिया) महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील खजिनदार व्यंकटेशवरराव कररा, तालुका अध्यक्ष प्रशांत सुर्वे, क्लब अध्यक्ष आदेश मर्चंडे आणि सर्व सदस्यांनी दोन्ही पंचांना शुभेच्छा दिल्या आहेत.