Home साहित्य संत गाडगेबाबा- कवयित्री अनिता नरेंद्र गुजर

संत गाडगेबाबा- कवयित्री अनिता नरेंद्र गुजर

Spread the love

संत गाडगेबाबा- कवयित्री अनिता नरेंद्र गुजर

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)


 

घेऊनिया झाडू | झाडी सर्व गाव |
डेबू त्याचे नाव | सर्वां ज्ञात ||

डोक्यावर सदा | टोपी खापरीची |
काच बांगडीची | कानामध्ये ||

रंजल्या गांजल्या |करी जनसेवा |
पुण्याईचा ठेवा | सांगतसे ||

देव देवस्कीने | येईल विपदा |
करी अंधश्रद्धा | निर्मूलन ||

भुकेल्या जिवाच्या | माणसात देव |
आनंदाची ठेव | शोधा तुम्ही ||

स्वच्छतेचे ज्ञान | ध्यास एक धरी |
प्रबोधन करी | जनतेला ||

मूर्तिपूजा तुम्ही | कधी नका करू |
चरण ते धरू | मायबापा ||

गोपाळा गोपाळा | देवकीचा नंद |
टाळ्यांचा छंद | भजनात ||

सौ.अनिता नरेंद्र गुजर
डोंबिवली
8097524197

सौ.अनिता नरेंद्र गुजर

Related Posts

Leave a Comment