अनुदीप फाऊडेंशन तर्फे संगणक प्रशिक्षण केंद्र व महाविद्यालयीन संस्थांचा गुणगौरव
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे- मेघना सुर्वे)
गेली अनेक वर्षे अनुदिप फाऊडेंशन ही सामाजिक संस्था संगणक प्रशिक्षण देऊन मुला मुलींना रोजगार मिळवण्याचे काम करत आली आहे. या संस्थेला अनेक महाविद्यालयीन संस्था व संगणक प्रशिक्षण केंद्र सहाय्य करतात.
अनुदिप फाऊडेंशनने आतापर्यंत अनेक संस्थाच्या मदतीने ६००० पेक्षा जास्त मुला मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळून दिला आहे. नुकताच ठाणे शहरात अनुदिप फाऊडेंशन यांच्यावतीने महाराष्ट्रातील संगणक प्रशिक्षण केंद्र तसेच महाविद्यालयीन संस्थाचा गुणगौरव तसेच पदचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष तन्मय मुखर्जी, प्रादेशिक प्रमुख सायबल अदक, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार दिनेश पानसरे, डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक अमर प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा बॅनर्जी, क्लस्टर हेड मुंबईचे अमोल खाडे, पुण्याचे क्लस्टर हेड प्रवीण बकाल, केंद्र प्रमुख महाराष्ट्र पुर्वी शहा, कॉर्पोरेट रिलेशन मॅनेजर पुणे येथील इरफान खान, पीआरओ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थिती होते.सदर कार्यक्रमात ४० हून अधिक संस्थेचे भागीदार हजर होते.