Home धार्मिक सम्यक बुद्ध विहार आणि सांस्कृतिक केंद्र भडवळे बौद्धवाडी नोंदणी जाहीर

सम्यक बुद्ध विहार आणि सांस्कृतिक केंद्र भडवळे बौद्धवाडी नोंदणी जाहीर

Spread the love

सम्यक बुद्ध विहार आणि सांस्कृतिक केंद्र भडवळे बौद्धवाडी नोंदणी जाहीर

 


(दिशा महाराष्ट्राची/ दापोली)


 

दापोली तालुक्यातील भडवळे गावातील बुद्धवाडीची आज आनंद बुद्ध विहार स्लेटर हाऊस, बांद्रा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आज या गावातील सम्यक बुद्ध विहार आणि सांस्कृतिक केंद्र हे नोंदणीकृत झाल्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले.

भविष्यात या सांस्कृतिक केंद्र अंतर्गत विविध सामाजिक धार्मिक तसेच विद्यार्थी मार्गदर्शन आणि महिला विकास अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार असून तालुक्याच्या विकासाचा एक केंद्र बिंदू असेल अशी अपेक्षा आहे.

अशा या ऐतिहासिक बैठकीस बहुसंख्य सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संजय जाधव या बैठकीचे अध्यक्ष होते.  सचिव प्रमोद जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि प्रस्तावना मांडली.

Related Posts

Leave a Comment