Home लेख शिवजयंतीचे खरे प्रणेते- महात्मा ज्योतिबा फुले

शिवजयंतीचे खरे प्रणेते- महात्मा ज्योतिबा फुले

Spread the love

शिवजयंतीचे खरे प्रणेते- महात्मा ज्योतिबा फुले

 


(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)


 

मराठी अस्मितेचा मानबिंदू , महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान, बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९३ वी जयंती आपण १९ फेब्रुवारीला साजरी करित आहोत. तर, या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधुन काढली? जगातील पहिली शिवजयंती कोणी साजरी केली? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे शिवजयंती मागील खरा इतिहास जाणून घेणे होय.

महाराष्ट्राच्या जाणता राजाची शिवरायांची समाधी शोधून काढणारे होते. महात्मा ज्योतिबा फुले. जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे होते, महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक लिहिणारे होते महात्मा ज्योतिबा फुले. मात्र षडयंत्री मनुवादी लेखकांनी शिवरायांचा पराक्रमी, गौरवशाली इतिहास दडपुन षडयंत्री खोटा इतिहास समाजाच्या माथी मारण्याचे काम हे करत आलेले आहेत. पण, आता तसं होणार नाही. कारण आता धडही आमचं असणार आहे आणि त्या धडावर डोकं ही आमचं असणार आहे. कारण आता वाचू लागले आहेत. बोलू, लिहु लागले आहेत. बहुजन हे आता वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथांचे वाचन करुन त्यावर चिकित्सा करत आहेत. वेगवेगळया विषयांवर संशोधन करुन लेखन करत आहेत आणि सत्य, असत्य पुरावेसह समाजापुढे मांडत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील पहिली जयंती हि महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली. हे काहींना माहित झालेले आहे. तर,काहीजण त्यापासून अजूनही दुरच आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना उभ्या डोळ्यांनी पाहवेना आणि त्याच रागासंतापाने शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर गेले. सलग तीन दिवस महात्मा ज्योतिबा फुले. हे शिवाजी महाराजांची समाधी शोधत होते. आणि इ. सन. १८६९ मध्ये ‌झाडाझुडूपात अडगळीत पडलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधुन काढली. ती स्वच्छ केली. त्यावर फुले वाहिली आणि विनम्रतेने शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी इ. सन. १८७० मध्ये पुणे शहरात पहिली शिवजयंती साजरी केली तेव्हा पासून ‘शिवजयंती’ साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. परंतु मनुवादी लोक म्हणतात, कि, बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली. परंतू, टिळकांचा जन्म इ. सन. १८५९ सालचा आणि सन.१८६९ साली त्यांनी शिवरायांची जयंती साजरी केली. मग, विचार करा कि, सन. १८६९ साल म्हणजे टिळक असतील तेव्हा चौथी किंवा पाचवीला मग एवढ्या लहान वयात टिळकांनी शिवाजी महाराजांची जयंती कशी सुरु केली असेल. प्रसिध्द इतिहास संशोधक, महात्मा फुलेंच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.हरी नरके. यांनी महात्मा फुले यांनीच जगातील पहिली शिवजयंती साजरी केल्याचे संशोधन केले आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे लोकांपर्यंत पोहचावे. यासाठी १ जुन १८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांवर प्रदिर्घ असा पोवाडा लिहून पहिले पुस्तक लिहिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली ‘शिवजयंती’ टिळकांनी नाही. तर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली आहे. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. तेव्हापासुन शिवजयंती हि मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहे. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी ‘शिवशके’ बंद करुन मुस्लिमांचा ‘फसली’ सुरू केला. शिवरायांचा रायगड उध्वस्त करून ऐतिहासिक दस्तावेज असलेला दप्तरखाना जाळुन राख केला होता. त्या पेशवाईचे समर्थन करण्यासाठी ब्राम्हणांचे जेष्ठ पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी “शिवजयंती” बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. शिवभक्तांमध्ये “शिवजयंती”बाबत संभ्रम निर्माण केला. पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती होऊ नये म्हणून ‘वाद’ कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने बहुजन एकत्र येतील. व एकत्र आलेले लोक हे आपल्यासाठी घातक असतील. कारण खऱ्या शिवचरित्रातून हक्क व अधिकाराची मागणी करणारे लोक निर्माण होतील. हे रोखण्यासाठी मनुवादी षडयंत्री लोकांनी “शिवजयंतीचा” वाद कायम चालू ठेवला. याबाबत महाराष्ट्रातील तमाम मराठा,कुणबीसह बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार अशा सगळ्या बहुजन समाजात जागृती निर्माण व्हायला हवी.

महाराष्ट्रातील लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कि, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानले होते. त्या महात्मा फुलेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरू मानले होते. अशी ही वैचारिक विचारांची गुंफन बहुजन लोकांनी समजून घेतली. तर, वैचारिक विचारांची चळवळ उभी राहिल. व समाजाच्या मनातील जाती- पातीची जळमटं दूर होऊ शकतील.

लेखक- प्रविण खोलंबे
संपर्क- ८३२९१६४९६१

Related Posts

Leave a Comment