Home क्रीडा हर्षीत बोबडेचे दमदार शतक- भास्कर ट्रॉफी स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय

हर्षीत बोबडेचे दमदार शतक- भास्कर ट्रॉफी स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय

Spread the love

हर्षीत बोबडेचे दमदार शतक- भास्कर ट्रॉफी स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय

 


(दिशा महाराष्ट्राची/ मेघना सुर्वे- मुंबई)


 

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे १ २ वर्षाखालील भास्कर ट्रॉफी स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लबने एम.बी. युनियन क्लबचा दणदणीत पराभव केला. नॅशनल क्रिकेट क्लब आणि एम.बी. युनियन क्रिकेट क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात नॅशनल क्रिकेट क्लबतर्फे त्यांचा सलामीवीर फलंदाज हर्षीत बोबडे याने संपूर्ण २५ ओव्हर नाबाद राहून ११७ बॉलमध्ये १६४ धावा केल्या.

या शतकी खेळीत त्याने २२ चौकार आणि ६ षटकार लगावले. हर्षीद बोबडे याच्या शतकाच्या जोरावर नॅशनल क्रिकेट क्लबने २५ षटकांमध्ये २५६ धावांचा डोंगर उभारला.

२५६ धावांचा पाठलाग करताना नॅशनल क्रिकेट क्लबच्या भेदक गोलंदाजांसमोर एम. बी. युनियनचा डाव गडगडला आणि त्यांचे सर्व खेळाडू केवळ १७ षटकात ५२ धावातच बाद झाले. त्यामुळे नॅशनल क्रिकेट क्लबने एम. बी. युनियनचा दणदणीत पराभव केला. या सामन्याचे विशेष म्हणजे हर्षीत बोबडेचे शतक मुख्य आकर्षण ठरले.

Related Posts

Leave a Comment