कवयित्री गीतांजली योगेश वाणी यांना लाडशाखिय वाणी मंडळ, पश्चिम उपनगरे, मुंबई आयोजित कला गौरव पुरस्काराने सन्मानित
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे)
लाडशाखिय वाणी मंडळ, पश्चिम उपनगरे- मुंबई तर्फे दरवर्षी प्रमाणे वार्षिक स्नेह संमेलन व गुणगौरव समारंभ दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी उत्साहात, जल्लोषात संपन्न झाला.
भारताचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने लाड शाखिय वाणी समाज, पश्चिम उपनगरे मधील पंच्याहत्तर वर्षे वय पुर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी आयु गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा कार्य गौरव तथा कला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सौ. गीतांजली वाणी ह्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा कला गौरव पुरस्कार देऊन सुप्रसिध्द व्यावसायिक श्री. डी. टी. शिरोडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल शिरोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हे स्नेह संमेलन गोरेगाव, मुंबई येथील कालि कल्लोळ माता मंदिर येथे आयोजित केले होते. ह्यावेळी अमृत महोत्सवी आयु गौरव पुरस्काराचे मानकरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. अशोक शिनकर, विश्वस्त श्री. बी. डी. वाणी, विश्वस्त श्री. वसंत महाजन, श्री मति वत्सला वाणी, श्रीमती. कांताबाई अमृतकर, श्री. वसंत कोठावदे, श्री. मधुकर अमृतकर, श्री. सुभाष महादु वाणी हे सर्व होते. तसेच समाजाला सढळ हाताने आर्थिक तथा कोणत्याही प्रकारची मदत स्वहस्ते निरपेक्ष करणारे ज्येष्ठ श्री. डी. टी. शिरोडे हे कृतज्ञतापूर्वक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित झाले.
ज्येष्ठ महिला सौ. शशीकला बाबुलाल वाणी ह्या देखील अध्यात्मिक कार्यासाठी कला गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्या. नवलाई महिला मंडळ अध्यक्षा उत्कृष्ट व्यावसायिक महिला सौ. प्रमिला दशपुते ह्या नवनिर्वाचित अध्यक्षा असूनही कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सन्मानित झाल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे खजिनदार श्री. पुरषोत्तम धामणे व सचिव श्री. अजय वाणी, कार्यकारिणी तथा नवलाई महिला मंडळ कार्यकारिणी सर्वांनी उत्साहाने व जबाबदारीने कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरूप आणले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओघवत्या भाषा शैलीत नवलाई सचिव सौ. गीतांजली वाणी व पश्चिम उपनगरे सचिव श्री. अजय वाणी यांनी केले. सुमधूर आवाजात स्वागत गीत नवलाई सहसचिव सौ. अनुपमा दशपुते व नवलाई सदस्या सौ. ज्योती मुसळे यांनी गायले. विविधरंगी खेळ आयोजन नवलाई उपाध्यक्षा सौ. विनीता कोठावदे, कार्यकारिणी सदस्य सौ. निर्मला टिपरे व नवलाई सदस्या सौ. शितल मराठे यांनी केले. उत्कृष्ट फोटोग्राफी जबाबदारीने सौ. स्नेहल नानकर व सौ. दिपाली कोठावदे यांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारा खर्च मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक शिनकर, विश्वस्त श्री. बी. डी. वाणी, व विश्वस्त श्री. वसंत महाजन यांनी उत्स्फूर्त देणगी देऊन केला. कार्यक्रमाला समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.