तळी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवारी तळे येथे बाळासाहेबाची शिवसेना पक्षाकडुन महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महारक्तदान शिबीर पार पडणार असुन खारघर ब्लड बँक नवी मुंबई यांच्या मार्फत हे रक्त संकलन केले जाणार आहे.
रक्तदान हेच जीवदान असल्याने जास्तीतजास्त नागरिकांनी रक्तदान करुन सर्वश्रेष्ठ दान करावे असे आवाहन शहर प्रमुख राकेश वडके यांच्या कडून करण्यात आले आहे. या आधी देखील तीन वेळा तळा शहरात रक्तदान शिबीरे पार पडली आहेत. या तिन्ही शिबीराला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.