Home धार्मिक भीमाई भूमी आंबेटेंबे (जेतवन) येथे भीमाई जयंती आणि भीमाई स्मारक भूमीपुजन जल्लोषात संपन्न

भीमाई भूमी आंबेटेंबे (जेतवन) येथे भीमाई जयंती आणि भीमाई स्मारक भूमीपुजन जल्लोषात संपन्न

Spread the love

भीमाई भूमी आंबेटेंबे (जेतवन) येथे भीमाई जयंती आणि भीमाई स्मारक भूमीपुजन जल्लोषात संपन्न

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे- मेघना सुर्वे)


 

रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी भीमाई भूमी जेतवन, आंबेटेंबे ता. मुरबाड जि. ठाणे येथे ‘दी बुध्दीस्ट कल्चर ट्रस्ट’ च्या वतीने भीमाई जयंती आणि भीमाई स्मारकाचे भुमीपुजन नामदार रामदास आठवले केंद्रीय समाजिक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमीपुजन जल्लोषात करण्यात आले. भीमाई जयंती महोत्सव सालाबादप्रमाणे माघी पौर्णीमेला साजरा करण्यात येतो. सदर कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल खालील मान्यवरांचा ‘भीमाई पुरस्कार’ संस्थेच्यावतीने देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रकाश पांढरे, बौध्दाचार्य नारायण जाधव, प्रकाश जाधव, के.जी. सुर्वे (समाजसेवक), चंद्रमणी जाधव (समाजसेवक), अशोक गायकवाड (समाजसेवक), कु. संयम खरे (गोल्ड मेडलिस्ट गीनीज वर्ल्ड रेकॉर्डीस्ट, लार्जेस्ट स्केटिंग), कु. अरहंत जाधव (गोल्ड मेडलिस्ट, स्केटिंग) वरील सर्व मान्यवरांचा सत्कार मा.ना. डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून सुभषदादा पवार (उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे), शंकर तोटावर (कार्यकारी अभीयंता सां. बां. खाते ठाणे), आर. ए. भालसिंग, सुरेशदादा बारशिंगे (राष्ट्रीय रिपाइं), भगवान भालेराव ( माजी उपमहापौर उ.नं.पा), कैलास पतिंगराव (उप- अभियंता सा. बां. वि.), दिनेश उघाडे (अध्यक्ष मुरबाड तालुका), जयवंत थोरात (शहापूर तालुका अध्यक्ष) तसेच मुरबाड, शहापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने जनसमुदायाच्या उपस्थितीत भूमीपुजन साहेळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संयोजिका प्रियाताई खरे यांनी भुषवून सुत्रसंचालन अभिमन्यू भालेराव यांनी केले तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रमोद जाधव, रेमश जाधव, राजेश खरे यांनी पार पाडले.

Related Posts

Leave a Comment