Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयाचे अडखळ येथे विशेष निवासी शिबिर संपन्न

मुंडे महाविद्यालयाचे अडखळ येथे विशेष निवासी शिबिर संपन्न

Spread the love

मुंडे महाविद्यालयाचे अडखळ येथे विशेष निवासी शिबिर संपन्न

 


(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)


 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर दि. 4 व 5 फेब्रुवारी 2023 रोजी अडखळ येथे मोठया उत्साहात संपन्न झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच सौ. करिना रक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचा सांगता समारंभ संपन्न झाला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पेश शिंदे, सुरेश रक्ते, सुनिती महाडिक, वाडी अध्यक्ष श्री. किशोर महाडिक, शंकर महाडिक, शंकर गायकवाड, अनंत शिंदे, ग्रामस्थ श्री. प्रसाद कदम, डॉ. प्रभाकर पेंडसे, श्री. विजय शिंदे, तेजस सोनगरे, आत्माराम महाडिक, सूरज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीर कालावधीत व्यक्तिमत्व विकास व समाजप्रबोधन, ग्रामस्वच्छता, रस्ते- दुरूस्ती, जलसाक्षरता, सार्वजनिक आरोग्य जाणीव-जागृती, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी अडखळ गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्त करण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळा, मंदिरे, बौद्धवाडी, आदीवासीवाडी, खालचीवाडी, वरचीवाडी व रामवाडी येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, पालापाचोळा व कचरा नष्ट करून ग्रामस्वच्छता करण्यात आली. दुस-या दिवशी गावाशेजारील निवळी नदीवर सुमारे 32 मीटर लांब व 1 मीटर रूंदीचा वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी प्रश्नावलीच्या माध्यमातून ग्राम सर्वेक्षण करण्यात आले.

यावेळी सौ सुनिती महाडिक, डॉ. प्रभाकर पेंडसे, श्री. सूरज महाडिक यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वयंसेवकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की, केवळ दोनच दिवसांमध्ये स्वयंसेवकांनी आपल्या श्रमदानातून गावाचा कायापालट केलेला दिसत आहे. यासाठी सर्वच ग्रामस्थांनी खूपच मोलाची मदत केलेली आहे. त्यांच्या सानिध्यात स्वयंसेवकही खूप काही शिकले आहेत. यापुढेही गावाशी असेच ऋणानुबंध कायम ठेवू असेही ते म्हणाले.

शिबिरातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थाध्यक्षा मा. सौ. संपदाताई पारकर, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, प्रा. डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, ग्रंथपाल दगडू जगताप, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच सौ.करिना रक्ते, ऍड. मिलिंद लोखंडे, एन. एस. एस. प्रतिनिधी तेजस सुगदरे, कु. अक्षता नाकती, नुपुर लांबे, सर्व गटप्रमुख, शिबिरार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Posts

Leave a Comment