श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान, वीर यांच्या शैक्षणिक निधी संकलन कार्यक्रमाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे)
श्री भैरी भवानी देवी प्रतिष्ठान, वीर, देवपाट विभाग वतीने आयोजित केलेल्या वीर देवपाट गावातील शैक्षणिक उपक्रम निधी संकलनासाठी कोकणी कलांचे एकत्रित धुमशान असलेले कोकणातील वास्तव्य घडामोडींवर भाष्य करणारी लोकप्रिय नाट्य कलाकृती “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य रसिकांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दामोदर नाट्यगृह परेल मुबंई येथे रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मागील दोन वर्षे उपरोक्त मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून संकलन झालेल्या निधीतून वीर गावात आरोग्य शिबीराचे आयोजन करून ग्रामस्थ नागरिकांना दिलासा दिला होता. मंडळाचे आधारस्तंभ कवी रमाकांत जावळे, दिपक कारकर यांच मोलाचे योगदान मार्गदर्शन घेत गावातील तरुण एकत्रित येत हा एक महत्वपुर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा संकलन निधी हा वीर गावातील एकूण तीन शाळांना देण्यात येणार आहे. त्यात घेवडे वाडी नं- २ शाळेला- ५० % तर जावळे वाडी- ४ शाळेला २५% आणि न्यू इंग्लीश स्कूल वीरला- २५ % अशाप्रकारे या तीन शाळेना मदत करण्यात येणार असल्याचे उपरोक्त संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाला श्रेया वीरकर वीर देवपाट सरपंच, रवींद्र मटकर- अध्यक्ष (नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र – भारत) सुधाकर मास्कर- सहसचिव (कलगी तुरा समाज उन्नति मंडळ-मुंबई) शाहिर तुषार पंदेरे, विनोद फटकरे, लेखक/ दिग्दर्शक- संदिप कानसे, पत्रकार- उदय दणदणे, सुरेश भुवड- वीर ग्रामविकास कार्याध्यक्ष, संतोष घाणेकर- अध्यक्ष पाणबुडी देवी कलामंच, शाहीर सचिन धुमक, संतोष अबगुल संस्थापक- अब्गुल प्रतिष्ठान, विजय वाघमोडे सर मुख्याध्यापक वीर नं. २ शाळा महेंद्र शिगवण, संतोष चौगुले- कुणबी बँक संचालक, अक्षय दुर्गोली- चला हवा येऊ द्या फेम, शाहिर- उमेश पोटले , संजय कदम असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपक कारकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत जावळे, दशरथ जावळे, शशिकांत जावळे, सहकारी तसेच पाणबुडी कलामंचचे शिलेदार,दिपक कळंबाटे,अंकुश गोताड कवी राम कळंबाटे शंकर कळंबाटे अमित दुर्गोली प्रवीण घेवडे यांचे मोलाचं सहकार्य लाभले. सदर उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे