भारतीय अपराध अनुसंधान जाँच एजेंसी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- अनंतराज गायकवाड)
भारतीय अपराध अनुसंधान जाँच एजेंसी महाराष्ट्र राज्य कार्यालायाचा उद्घाटन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील माझगाव डॉक येथील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मा. राम गोपाल वर्मा (राष्ट्रीय संचालक), मा. महेश कांबळे (महाराष्ट्र राज्य संचालक), मा. सौ. मनाली कांबळे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष [अपराध विभाग]), नवी मुंबईचे मा. प्रदीप कणसे (महाराष्ट्र राज्य सहसचिव ) मा. सौ. रेशमा कणसे (महाराष्ट्र राज्य स्पेशल ऑफिसर [महिला विभाग]) मा. श्री. वृक्षत आलम (नवी मुंबई संपर्क प्रमुख ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आयोजकांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सत्कार कर्त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाच्या कार्यकारणीस शब्दसुमनांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.