मुरबाड येथे भिमाई जयंतीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- मेघना सुर्वे)
दि. बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने १६९ वी माता भिमाई जयंतीचे रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ, भिमाईभूमी, जेतवन, आंबेटेंभे, ता. मुरबाड, जिल्हा ठाणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात भिमाई स्मारकाचे भूमिपुजन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री, पंचायत राज, भारत सरकारचे कपिल पाटील, मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे येथील सुभाष पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून समाधान इंगळे ( सहा.आयुक्त, समाज कल्याण, ठाणे), संदिप आवारे ( तहसिलदार, मुरबाड), आर. ए. भालसिंग (उपविभागीय पोलिस अधिकारी), शंकर तोटावर (कार्यकारी अभियंता, सां. बां. ठाणे), सुरेशदादा बारशिंगे (रा. सचिव तथा ठाणे जि. निरीक्षक, रिपाइं- आठवले), आण्णासाहेब रोकडे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रिपाइं- आठवले), भगवान भालेराव (माजी उपमहापौर, उमनपा उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष), कैलास पतींगराव (उपभियंता, सा. बां. वि.) आदींची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
आयोजित कार्यक्रमात प्रसाद पांढरे ( व. पो. नि. मुरबाड), प्रकाश जाधव (अध्यक्ष सा. अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान), बौध्दाचार्य नारायण जाधव (प्रवचनकार, निळजेकर), के.जी. सुर्वे (जेष्ठ समाजसेवक, असोरे), चंद्रमणी जाधव ( समाजसेवक), अशोक गायकवाड( जेष्ठ समाजसेवक), कु. संयम खरे (गोल्ड मेडेलिस्ट गिनिज वर्ल्ड रेकॉर्डिस्ट, लॉजेस्ट स्केटिंग ९६ तास) कु. अरहंत जाधव (गोल्ड मेडेलिस्ट, स्टेटिंग) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे सभाध्यक्ष दादासाहेब खरे असणार असून स्वागताध्यक्ष प्रमोद जाधव, रमेश जाधव आहेत. सुत्रसंचालनाची जबाबदारी अभिमन्यू भालेराव सांभाळणार आहेत. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे संयोजिका प्रियाताई खरे यांनी एका पत्रकादारे विनंती केली आहे.