Home लेख बदल- अभिनेत्री कोमल धांडे पाठारे

बदल- अभिनेत्री कोमल धांडे पाठारे

Spread the love

बदल- अभिनेत्री कोमल धांडे पाठारे

 


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई)


 

हळदी कुंकू” हा सर्व स्त्रियांचा आवडता कार्यक्रम!!
या कार्यक्रमात स्त्रिया एकत्र येतात, हळदी कुंकू घेतात, वाण लुटतात, खेळ खेळतात, नाचतात, गातात. संसाराच्या धकाधकीत काही क्षण आपल्या सख्यांसोबत आनंदात घालवतात!!! ही एक गोड आणि सुंदर बाजू !!!

परंतु याच कार्यक्रमात अजूनही फक्त ठराविक स्त्रियांनाच (सौभाग्यवती) आमंत्रण दिलं जातं!! मुळात स्त्रियांची ओळख त्यांच्या वैवाहिक status वरून आजही ठरवली जाते. सण समारंभ जरूर केले पाहिजेत पण त्यात काळानुसार बदल हे व्हायला हवेत नाहीतर वर्षानुवर्ष ज्या अन्यायकारक परंपरा सुरू आहेत त्या तशाच सुरू राहतील. कोणीतरी याची सुरुवात करायला हवी!!!

एरवी आपण बायका पुरुषांनाच दोष देत असतो. पुरुषप्रधान संस्कृतीत बायकांवर असे अत्याचार होत आलेत वगैरे वगैरे… आता तर बायका शिकल्या ,मोठ्या झाल्या, स्वतंत्र झाल्या मग आता बायकांनी तरी प्रथा बदलल्या का??? उलट पुरुषप्रधान संस्कृती टिकवण्याच सर्वात मोठ काम बायकाच करत आहेत… अगदी सुशिक्षित घरातही तेच पाहायला मिळत… मग नेमक काय बदल झालाय बायकांच्या जीवनात. तर त्या आता “स्वतंत्र” आणि “आर्थिक दृष्ट्या प्रबळ” झाल्यात आणि याचा वापर त्या अनेक चुकीच्या गोष्टींसाठी करत आहेत. बर शिक्षणाचा वापर करुन समाजातील किमान काही स्तरावर पोहोचून त्यात काम करणं, चुकीच्या गोष्टींचं खंडन करणं तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण हे स्त्रियांकडून अपेक्षित होत आपल्या महापुरुषांना !!! ज्यांनी स्त्रियांच्या उधरासाठी आपला आयुष्य घालवल त्या ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पण माहित नसेल अनेक महिलाना !! आपण जन्म दात्यांचे वाढदिवस साजरे करतो, त्यांना सन्मान देतो मग ज्यांच्यामुळे आपण हे सुख अनुभवतोय ते जन्मदात्यापेक्षा कमी आहेत का??? त्यांची नाव सुधा काही जणींना माहीत नाहीत. त्यांची जयंती, पुण्यतिथी कधी येते कधी जाते ते देखील आपल्याला माहीत नसतं. त्यांच्या ऋणातून तर आपण कधीच उतराई होऊ शकत नाही!!!

Reels बनवा, यूट्यूब vlog बनवा, फोटो सोशल मीडिया जरूर टाका पण हे सगळं करताना तुमच उद्देश निखळ मनोरंजन किंवा लोकांना काहीतरी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध व्हावी हा असायला हवा. परंतु दुर्दैवाने स्त्रिया या मध्ये ही पुरुषांच्या चार पावल पुढे आहेत. स्वतःवर प्रेम करा पण स्वत्व हरवू नका !!!

फक्त महागातील साडी, ड्रेस, मेक उप, मिरवणे, पैसे कमवणे आणि उधळणे एवढंच धेय नसावं!!! तुम्ही म्हणाल मग हे सगळ आम्हीं करायचं नाही का?? अर्थात करायचं पण हे म्हणजेच आयुष्य असा समजून जगू नका. आयुष्य खूप लहान आहे. या एका आयुष्यात आपल्या हातून काहितरी सत्कर्म व्हावं याचाही विचार करा आणि हे मुख्य ध्येय असायला हवं.  तुमच्या कला गुणांना जरूर जपा. पण ते करत असताना सामाजिक भान असणं अत्यंत आवश्यक आहे.

नाहीतर शिक्षण, स्वातंत्र्य, सवलत याचा काय उपयोग???? गेली अनेक वर्ष दुर्दैवाने सर्व कुप्रथा टिकवून ठेवण्याचं आणि अधिक वाढवण्याच काम बायकाच करत आहेत !!!!

स्त्री ही समाज घडवू शकते आणि बघडवू ही शकते !!!!
स्त्री भ्रूण हत्या, स्त्री देह विक्री, हुंडाबळी, शारीरिक हिंसा, अगदी बलात्कार सुद्धा या सर्व विकृतींमध्ये स्त्रियांचा सहभाग सर्वात मोठा आहे. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे !! आपला मुलगा किंवा नवरा हा चांगल्या चालीचा नाही हे आईला किंवा बायकोला माहीत नसेल काय??? मग जर तिला माहित असूनही ती दुर्लक्ष करत असेल तर दोष तिचाही आहे!!! शांत बसून ती अनेक मुलींचे प्राण धोक्यात घालत आहे !!!

फक्त पुरुषांना दोष देण्यात काही अर्थ नाही, सगळ्याच मूळ कुठेतरी स्त्रियाच आहेत !!! आधी स्वतः ल वळण लावावं,मग मुलांना,चुकत असेल तिथे नवऱ्याला दाबाव, अन्याय होत असेल तर तिथेच ठेचाव हे जर प्रत्येक स्त्री ने केलं तर समाज बदलायला वेळ लागणार नाही !!! सणासुदीत मिरवतना सुद्धा भेदभाव केला जातो,तो काय पुरुष करतात का, स्त्रियाच करतात…! ( विधवा, सध्वा)

स्त्रियांनी अधिक संवेदनशील आणि समंजस होणं खूप गरजेचं आहे नाहीतर समाजाच्या अधोगतीच करणं स्त्रियाच ठरतील!!!!

लोक म्हणतात की आता धरतीवर महापुरुषाने अवतार घेतला पाहिजे, अरे पण महापुरुषाने अवतार घ्यायला जन्म घ्यावा लागेल आधी धरतीवर. पण मग कोणाच्या पोटी महापुरुष जन्म घेईल????? भगवान बुध्दाला जन्म देणारी महामाया, श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी, प्रभू येशू ल जन्म देणारी मदर मेरी, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देणारी भिमाई, अनाथ मुलांना मायेच छ्त्र देणाऱ्या सिंधुताई सपकाळ आता आहेत का समाजात????

मैत्रिणींनो आपण याचा विचार करायला हवा !!!! “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” ही उक्ती कायम स्मरणात असू द्या.
“बदल” हा स्वतः पासून करूया, जग आपोआप बदलेल
?????

कोमल धांडे – पाठारे
गायिका/अभिनेत्री/बँकर

Related Posts

Leave a Comment