Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

मुंडे महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

Spread the love

मुंडे महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)


 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन. एस. एस. विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ‘मतदार हक्क जनजागृती’ या विषयावर मंडणगड किल्ला येथे पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, डॉ. संगीता घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थित सर्वांना प्रा. शरीफ काझी यांनी ‘मतदार षपथ’ दिली.
यानंतर मंडणगड किल्ल्यावर उपस्थित जनसमुदाया समोर राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती केली. पथनाटयास उपस्थित जनसमुदायाने उत्स्फुर्त दाद दिली. सदर पथनाटयामध्ये अक्षता नाकती, तबसुम खान, अनिष सुतार, साहिल काप, नुपुर लांबे, तेजस सुखदरे, शुभम शिंदे, दिपेश पंदीरकर, योगेश तांबे, प्राजक्ता मांडवकर, सलोनी जंगम आदी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे व एन. एस. एस. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Posts

Leave a Comment