Home शैक्षणिक महेशभाई गणवे यांच्याकडून मुंडे महाविद्यालयास संगणक भेट

महेशभाई गणवे यांच्याकडून मुंडे महाविद्यालयास संगणक भेट

Spread the love

महेशभाई गणवे यांच्याकडून मुंडे महाविद्यालयास संगणक भेट

 


(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)


 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासाठी मूळचे टाकेडे गावचे सुपूत्र सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले उद्योजक आणि समाजसेवक श्री. महेशभाई गणवे यांनी महाविद्यालयास दहा संगणक संच, एक प्रिंटर, सहा लोखंडी डबलडोअर कपाटे व एक लाकडी नियतकालिक कपाट भेट म्हणून नुकतेच देणगी स्वरूपात दिले आहे.

श्री. महेशभाई गणवे यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, संस्था अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, कार्यवाह श्री. सतीश शेठ, सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, संस्थापदाधिकारी, प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले. महाविद्यालयाच्या वार्शिक स्नेहसंमेलनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांच्या हस्ते श्री. महेशभाई गणवे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, महेशभाईंसारख्या दानशूर व्यक्ती आज दुर्मीळ होत चालल्या आहेत. महेशभाई यांनी दिलेला शब्द लागलीच खरे करून दाखविले. त्यांनी विनाविलंब महाविद्यालयाला वस्तुरूपात दिलेली देणगी अतिशय महत्वाची आहे. कारण महाविद्यालयाचे चैथे ‘नॅक’ मूल्यांकन असल्यामुळे उपरोक्त वस्तू देऊन फार मोठी उणीव भरून काढली आहे. परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातून येणा-या विद्याथ्र्यांसाठी संगणक व तत्सम साहित्य उपयोगी पडणार आहे. सदर साहित्य मिळविण्यासाठी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. राम देवरे व डॉ. विष्णू जायभाये यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

Leave a Comment