Home आरोग्य ३८ कोटी खर्च करून मुंबईतील प्रसाधनगृहात पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवणार

३८ कोटी खर्च करून मुंबईतील प्रसाधनगृहात पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवणार

Spread the love

३८ कोटी खर्च करून मुंबईतील प्रसाधनगृहात पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवणार

 


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)


 

एका मशीनची किंमत ६५ हजार

संपूर्ण मुंबईतील प्रसाधनगृहात तब्बल पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे या मशीनमधून किती सॅनिटरी नॅपकीनची विक्री झाली, ते थेट घनकचरा व्यवस्थापन विभागाला कळणार आहे. एका मशीनची किंमत ६५ हजार रुपये असून पाच हजार मशीन बसवण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी २० हजार शौचालय बांधण्याचे जाहीर केले असून, यात महिलांसाठी शौचालय बांधण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रसाधनगृहात सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याचा निर्णय घेतला असून मुंबई महापालिका व म्हाडाची सुमारे ८ हजार प्रसाधनगृह आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या १ कोटी २० लाख असून त्यापैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे अधिकाधिक मशीन झोपडपट्टीतील प्रसाधनगृहात बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

एका सॅनिटरी नॅपकीन मशीनमध्ये तीन पॅड उपलब्ध असून, त्याची किंमत १० रुपये आहे. परंतु एक पॅड किती रुपयांत विक्री करायचा याचा दर अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. परंतु लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Related Posts

Leave a Comment