मंडणगड महाविद्यालयामार्फत रस्ता सुरक्षाबाबत तालुक्यात जनजागृती मोहिम
(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी पोलीस स्टेशन, मंडणगड यांच्या सहकार्याने मंडणगड शहर एस. टी. स्टॅन्ड, भिंगळोली व तालुक्यातील कुंबळे आदी ठिकाणी जावून रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती केली.
यावेळी चारचाकी प्रवासादरम्यान सीटबेल्ट वापरणे, ट्रिपल सिट व विना हेल्मेट बाईक चालविणे, नशा करून गाडी चालविणे तसेच गाडी चालविताना मोबाईलचा वापर करणे, यांमुळे दररोज होणारे अपघात, होणारी जीवित हानी व याबाबत घ्यावयाची काळजी याबद्दल विविध गीते व पथनाटय आदींच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी मंडणगड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ. शैलजा सावंत, नगरसेवक आदेश मर्चंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे, एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी अक्षता नाकती, नुपुर लांबे आदी विध्यार्थानी परिश्रम घेतले.