कोकण भुमिपुत्र/ कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / पुणे)
कोकण भुमिपुत्र/ कन्या युवा सामजिक प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व मकर संक्राती निमित्ताने तिळगुळ वाटप, हळदी- कुंकु समारंभ रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी जनता सांस्कृतिक हॉल, पर्वती पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
उपरोक्त संस्थेच्या वतीने २०१८ पासुन कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविन्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पुढे मान्यवरांचे सत्कार समारंभ, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, मान्यवरांचे मनोगत व हळदी कुंकू समारंभ असा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांचे व युवकांच्या एकजुटीचे कौतुक करण्यात आले. ह्या वर्षी वर्ष्याच्या सुरुवातीला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व हळदी- कुंकु समारंभ ह्या कार्यक्रमासाठी उपरोक्त संस्थेचे मार्गदर्शक विजय शिंदे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्वती विभाग उपविभाग अध्यक्ष योगेशदादा आढाव व नलिनीताई आढाव तसेच संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार सचिन रेमजे साहेब, नारायणजी रेवाले साहेब, मनोहरजी नाचरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाड तालुका रहिवासी संघाचे- श्री. सुनिलजी पवार साहेब, रूपेशजी पार्टे साहेब, संजयजी मोरे साहेब, महाड प्राण प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष श्री. मुकेशभाई पोटे, भाजपा पर्वती सरचिटणीस श्री. राजाभाऊ कदम, शिवसेना पर्वती विभागप्रमुख श्री. सुरजदादा लोखंडे, सौ. मानसीताई देवाळे व सौ. नलिनीताई आढाव, मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे श्री. सतिशजी मोरे साहेब, जनकल्याण फाउंडेशनचे श्री. संतोषजी जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेशजी सपकाळ साहेब, श्री. कैलासजी सावंत साहेब, श्री प्रविणजी भोज साहेब, श्री. विनायकजी जोशी साहेब, श्री. संजयजी गावडे साहेब, श्री. ज्ञानेश्वरजी भागणे साहेब, श्री. दिनेशजी गिजे साहेब, साहिल केम्युनिकेशनचे श्री. हेमंतजी मोरे साहेब, पै. श्री. भरतजी चौधरी साहेब, शाहीर श्री. दगडू हुंबरे व विविध सामजिक संस्थांचे व राजकीय मान्यवर मंडळी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विजय शिंदे, ऋषिकेश कवडे, ऋषिकेश लाड, प्रसाद बोले, प्रथम हुंबरे यांनी प्रचंड मेहनत घेतली व संस्थेचे पदाधिकारी पूर्वेश मलेकर, रोशन गोमले, सुदेश भागणे, अक्षय निकम, पूजा गावडे, सौ.तनया खांबे, सौ.विधीशा शिंदे, दर्शना निकम, विनायक जाडे, जय जाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार खांबे व आभार प्रदर्शन कु. वृषाली गोरीवले यांनी केले. तसेच नववर्षाची दिनदर्शिका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण व कोकणातील गावांत विनामूल्य वितरण करण्यात येणार आहेत व ज्यांची जाहीरातरुपी मदत करू उपक्रमास सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.