तळवली प्रशाळेत गॅस सिलेंडर, शेगडीचा सुरक्षित वापर
करण्याविषयी मार्गदर्शन
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी तळवली येथील रंगलिला इंण्डेन गॅस चे वितरक श्री अंकुश पिलवलकर यांच्या सौजन्याने इंडियन ऑईल च्या डी. जि.एम. श्रीमती नंदा दळवी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना LPG गॅस तसेच शेगडी चा योग्य व सुरक्षित वापर कसा या विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार यांनी DGM श्रीमती दळवी मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जेष्ठ शिक्षक श्री उत्तम कचरे सर यांनी वितरक श्री अंकुश पिलवलकर यांचे स्वागत केले. त्यांनी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर श्रीमती नंदा दळवी मॅडम यांनी विविध उदाहरणे देत प्रात्यक्षिक दाखवत सविस्तर मौलिक माहिती दिली.
गॅस लिकेज कसे ओळखावे? अशा वेळी काय करावे? सुरक्षा पाईप, रेग्युलेटर व शेगडी व्यवस्थित आहे की नाही हे कसे ओळखावे. याबाबतीत कोणती काळजी घ्यावी वगैरेची माहिती दिली. शेवटी प्रशालेतील क्रीडा शिक्षक भूषण बागल सर यांनी आभाराने कार्यक्रमाचा समारोप केला.