Home सांस्कृतिक ६० वर्षे गौरवशाली परंपरेची कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा “हिरक महोत्सव सोहळा” होणार मुंबईत साजरा

६० वर्षे गौरवशाली परंपरेची कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा “हिरक महोत्सव सोहळा” होणार मुंबईत साजरा

Spread the love

६० वर्षे गौरवशाली परंपरेची कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा “हिरक महोत्सव सोहळा” होणार मुंबईत साजरा

 


(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे)


 

गेली सहा दशक कोकणातील कलगी- तुरा (शक्ती-तुरा) लोककलेचं जतन संवर्धन करण्याबरोबरच शाहिरी कलाकारांच्या उन्नतिसाठी सदैव कार्यरत असणारी “कलगी-तुरा” समाज उन्नती मंडळ (मुबंई) संस्थेला ६० वर्ष पूर्ण होत असून संस्था ६१ व्या वर्षात अभिमानास्पद पदार्पण करत आहे.

गौरवशाली परंपरा असणाऱ्या कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ – मुबंई, (महाराष्ट्र) या संस्थेचा “हिरक महोत्सवी वर्ष” रविवार, दिनांक २९ जानेवारी- २०२३ रोजी रात्रौ ८ वा. दामोदर नाट्यगृह परेल (मुबंई) येथे सन्मा. आमदार- भरतशेठ गोगावले, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सन्मा. आमदार उदय सामंत (रायगड- रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य), मा. प्रमोद गांधी (समाजसेवक/उद्योजक), मा.विठ्ठल चिविलकर (चेअरमन- कुणबी बँक), मा. भूषण बरे (कुणबी समाजोउन्नती संघ), मा. जितेंद्र सावंत (सदस्य- रा. जि. प.) मा.सुशांत जाबरे (उद्योजक), मा. इकबाल चांदले- (महाड तालुका संपर्क प्रमुख), मा. एकनाथ सुकुम (महाड तालुका सह. संपर्क प्रमुख शिवसेना-शिंदे गट) अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर “हिरक महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेला आणि विशेषतः कलगी- तुरा लोककलेला योगदान देणाऱ्या महान आणि जेष्ठ शाहिरांना “कलगी-तुरा कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यानिमित्त उपस्थितांच्या मनोरंजनार्थ “भेदीक शाहिरी” तसेच “तमाशा” व “कलगी-तुरा” ( जाखडी नृत्य) लोककलांचे सादरीकरण होणार असून “हिरक महोत्सव”कार्यक्रम नियोजनबद्ध तेवढंच भव्यदिव्य होण्यासाठी कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ (मुबंई) संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या उत्साहात जय्यत तयारीला लागले आहेत.

Related Posts

Leave a Comment