Home शैक्षणिक ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना मोहिते “राज्यस्तरीय बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड” ने सन्मानित

ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना मोहिते “राज्यस्तरीय बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड” ने सन्मानित

Spread the love

ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना मोहिते “राज्यस्तरीय बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड” ने सन्मानित

 


(दिशा महाराष्ट्राची / ठाणे)


 

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीस असोसिएशन (MESTA) यांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनात शैक्षणिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थापक यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.  त्यांच्या व Mesta चे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवली प्रोग्रेसिव्ह संचालित (डोंबिवली) ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना अरविंद मोहिते यांना बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

 

 

सदर सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनासह कौतुक होत आहे. सर्वांचे मोहिते यांनी आभार ही मानले आहेत. आपण यापुढे असेच जोमाने शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नेहमीच कार्यरत असू असे त्यांनी प्रतिनिधींजवळ बोलताना सांगितले

Related Posts

Leave a Comment