Home राजकीय बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे आयोजन

बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे आयोजन

Spread the love

बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे आयोजन

 


(दिशा महाराष्ट्राची / वाशी- अनंतराज गायकवाड)


 

बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा यांच्यावतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य अश्या विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन १८ जानेवारी रोजी दुपारी ४.०० ते ७.०० दरम्यान विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले आहे. या विनम्र अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमासह सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.

१८ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभिवादन सोहळ्यास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, खासदार लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आणि बाळासाहेबांची शिवसेना उपनेते विजय नाहटा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या सन २०२३ च्या दैनंदिनीचे प्रकाशन, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्यासोबत किंवा त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या सर्व गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व सन्मान आणि पुनर्विकास प्रक्रियेतील लाभार्थींना त्यांच्या नव्या घराचे पी- एएए करारपत्र दस्तऐवज वितरण करण्यात येणार आहे.

सदर विनम्र अभिवादन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन उपनेते विजय नाहटा यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी केलेले असून सर्व शिवसैनिकांनी कार्यक्रमास मोठ्या उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment