सामूहिक सूर्यनमस्कार अभ्यास मुंबई जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे)
महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्याच्या वतीने, मकरसंक्रांतीच्या निमित्त रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी मुंबईत विविध ठिकाणी आणि गुजरात येथील वापी व उमरगाव येथे सामूहिक सूर्यनमस्कार अभ्यास याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
सचिव सुषमा माने, सदस्य किसन पाटील हे गुजरात मध्ये तर कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, सचिव अमित चिबडे हे मालाड येथे, मीडिया प्रभारी निलेश साबळे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई हे दहिसर/ बोरिवली येथे, महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे ह्या ऑनलाइन पध्दतीने वरळी येथे, उपाध्यक्षा रेश्मा धुरी पाटील, अध्यक्ष संतोष खरटमोल हे मुंबई पवई येथे, सचिव सुषमा माने, श्वेता पिसाळ, विजयालक्ष्मी शर्मा, संयुक्त सचिव प्रशांत मकेसर हे मिरारोड येथे, महासचिव प्रसाद काठे आणि सचिव साक्षी कलगुटकर हे साकिनाका येथे, संघटक सचिव विकास ओव्हाळ, वडाळा भक्ती पार्क येथे, सचिव वर्षा शर्मा, कार्यालय सचिव जयदीप कनकीया हे कांदिवली येथे अशा विविध ठिकाणाहुन मुंबई जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील व गुजरात येथील अनेक साधकांकडून सूर्यनमस्काराचे अभ्यास करून घेण्यात आले.
सर्व उपक्रमात महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सर, राज्य कोषाध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी सर, INO चे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष श्री शिवानंद महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ह्या प्रसंगी मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी १५ जानेवारी २०२३ मकरसंक्रांतीचे निमित्त साधून सामूहिक सूर्यनमस्कार अभ्यासाच्या आयोजनात सहभागी झालेल्या मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य व उपस्थित सर्व साधकांचे अभिनंदन केले व आभार मानले.