सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक अविनाश ठाकूर यांना “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२३” जाहीर
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे)
सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (रजि.), आंबाजोगाई, बीड तर्फे दरवर्षी वेगवेगळया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२३” प्रदान केले जातात. यावर्षी हा मानाचा पुरस्कार डोंबिवली, जि. ठाणे या सांस्कृतिक नगरीचे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश एस. ठाकूर यांना जाहीर झाला असून येत्या २२ जानेवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सदरचा पुरस्कार कवी अविनाश ठाकूर यांनी केलेल्या साहित्य क्षेत्रातील विशेष व उल्लेखनीय कार्याचा ,सेवेचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार्थी सुप्रसिद्ध कवी अविनाश ठाकूर यांना आता पर्यंत अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात एक राष्ट्रीय तसेच भारत राष्ट्र चेतना पुरस्कार, राज्यस्तरीय स्वदेशी पुरस्कार, राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय विश्व समता काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार यापूर्वीही मिळाले असून सर्व साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.