महाड मधील लोकविकास तर्फे महाड महोत्सवाचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
सांस्कृतिक साहित्यिक क्रिडा त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या महाड मधील लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे ११ ते १९ जानेवारी पर्यत महाड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव नवे नगर येथील स्व. माणिकराव जगताप क्रिडा नगरीत होणार असल्याची माहीती महोत्सवाचे संयोजक व लोकविकास सामाजिक संस्थेचे हनुमान जगताप यांनी पत्रकार परिषेदे मध्ये दिली. लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे २०१६ पासुन महाड महोत्सव साजरा करीत असुन मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव महापुरामुळे या महोत्सवाचे आयोजन करता आले नाही मात्र यावर्षी हा महोत्सव भव्य स्वरुपामध्ये साजरा करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषेदेला माजी नगराध्यक्ष संदिप जाधव, माजी नगरसेवक प्रमोद महाडीक, सामाजिक कार्यकर्ते सुदेश कलमकर, धनंजय देशमुख, रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.