बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्रचे “कोकण रत्न” पुरस्कार जाहीर
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई)
गेली दहा वर्षे कलावंतांच्या हितासाठी कार्यरत असणारी बहुजन हितवर्धक कला संस्था कोकण मुंबई सह सर्व महाराष्ट्रास परिचित आहे. कालकथित कोकणचे सुपुत्र संस्थापक कवी रमेशजी येलवे आणि सहसंस्थापक सूरज म्युझिक कंपनी चे निर्माते आयु प्रदीपजी खेत्रे यांनी स्थापन केलेली संस्था विविध उपक्रम, कलावंत यांना मार्गदर्शन, त्यांचे साहित्य प्रकाशन, त्यांचा गुणगौरव, गीत गायन स्पर्धा घेत आहे. कोरोना आपत्ती काळात कलावंतासाठी या संस्थेने आर्थिक सहकार्य केले आहे.
कलावंतांना प्रेरणा मिळावी यासाठी कोणतीही फाईल न मागविता ज्यांनी पंचवीस वर्षापेक्षाही जास्त कालावधीत आपल्या गीत लेखन गायन मधून सामाजिक प्रबोधन करून जनजागृती केली आहे अशा व्यक्तींची खात्रीशिर माहिती घेऊन अनेक वर्षे स्वतः पाहुन कोकणातील दहा तालुक्यातील दहा जणांना “कोकणरत्न पुरस्कार” जाहीर केले आहे.
हा सन्मान सोहळा प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र बांद्रा मुंबई येथे रविवार दि 29 जानेवरी 2023 रोजी महाराष्ट्राचे सांस्कृतीक मंत्री मा. ना. सुधीर मनगुटिवार, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती मा. आनंदराज आंबेडकर आणि सूरज म्युझिकचे निर्माते मा. प्रदीपजी खेत्रे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
1) भिमराव गमरे- संगमेश्वर
2) राष्ट्रपाल सावंत- चिपळूण
3) राजेश सावंत- गुहागर
4) संघराज तांबे- खेड
5) महेंद्र चाफे- दापोली
6) विश्वजित लोखंडे- मंडणगड
7) मारुती सकपाळ (नाना )- महाड
8) अशोक कवाडे- श्रीवर्धन
9) भगवान साळवी- म्हसळा
10) कुणाल भोईर- पालघर
अशा दहा जणांना सदर संस्थेचा पुरस्कार जाहीर केले आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, रोख रक्कम अशा प्रकारे असून विद्यमान अध्यक्ष कवी गायक संतोष गमरे आणि सहसंस्थापक प्रदीपजी खेत्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.