Home क्रीडा किल्ला गावची सुकन्या अनुश्री बामुगडे गडारोहन स्पर्धेत विजेती

किल्ला गावची सुकन्या अनुश्री बामुगडे गडारोहन स्पर्धेत विजेती

Spread the love

किल्ला गावची सुकन्या अनुश्री बामुगडे गडारोहन स्पर्धेत विजेती

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

रोहे तालुक्यातील किल्ला गावची सुकन्या असणारी व उत्कृष्ट खेळाडु म्हणून नावलैकिक प्राप्त केलेल्या अनुश्री अविनाश बामुगडे हिने रायगड जिल्हा गडरोहन स्पर्धेत सर्वेत्कृष्ट कामगिरी करुन प्रथम क्रमाकांची मानकरी ठरली आहे.

किल्ले रायगड येथे ही जिल्हास्तरीय गडारोहन स्पर्धा संपन्न करण्यात आली. या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अनुश्रीने १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात सहभाग होऊन तिने ही कामगिरी करुन दाखविली आहे.

सेट झेव्हियर्स हायस्कुल अँण्ड ज्युनियर काँलेज शिरगाव महाड येथे शिक्षण घेत असलेल्या अनुश्री ने आपल्या गुणकौशल्याच्या जोरावर विविध स्पर्धेत मोठ्या संख्येने पारितोषिक प्राप्त केली आहेत.

या सुयशाबद्दल किल्ला ग्रामस्थ महीला मंडळ वतरुण मंडळ तसेच समस्त बामुगडे परिवार व क्रीडाप्रेमी, नागरीक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Posts

Leave a Comment