Home सामाजिक रसायनी मध्ये दिवा सावंतवाडी पँसेंजर ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

रसायनी मध्ये दिवा सावंतवाडी पँसेंजर ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

Spread the love

रसायनी मध्ये दिवा सावंतवाडी पँसेंजर ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

रसायनी रेल्वे स्टेशनवर सकाळी ७. ४५च्या सुमारास दिवाहुन सावंतवाडीला जाणारी पँसेंजर आणि दुपारी १२. ३० च्या सुमारास रत्नागिरी दिवा ही पँसेंजर थांबत नसल्याने प्रवासी विद्यार्थी आणि नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

दरम्यान पाताळगंगा औद्योगिक परिसर बिपीसीएल कंपनी इस्त्रो कंपनी तसेच पिल्ये काँलेज व इतर शाळा असल्याने नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करत आहेत. लाँगडाऊन अगोदर नियमित रेल्वे रसायनी थांब्यावर थांबत होत्या. सध्या रसायनी थांबा घेतच नसल्याने सदर रेल्वे रसायानी थांब्यावर थांबविण्यात याव्यात असे रेल्वे प्रशासनाला नागरिकांतुन मागणी होत आहे.

ज्या रेल्वे थांबत आहेत त्याचे तिकीट मिळण्याची सोयही इथे उपलब्ध नसल्याने पनवेल इथे पकडले गेल्यास फुकट त्रास सोसावा लागत आहे. तसेच रसायनी ते पनवेल हे प्रवासी भाडे१०रु थारी कोरोना काळात स्पेशल ट्रेनसाठी लावलेले ३० रुपये भाडे अजुन तसेच असल्याने प्रवाशांना नाहक जास्तीचे भाडे सोसावे लागत आहे हे वाढलेले भाडेवाढ त्वरीत मागे घ्यावेत अशी प्रवाशांची मागणी आहे.

Related Posts

Leave a Comment