उत्स्फूर्त प्रतिसादाने राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या नाव नोंदणीस सुरूवात
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई)
महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे औचित्य साधून (14 जानेवारी ते 28 जानेवारी) महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय काव्यसमूह “कविता : तुझी आणि माझी!” मार्फत पहिला वहिला माय मराठी राज्यस्तरीय काव्यमहोस्तव व कविसम्मेलन दिनांक 21 आणि 22 जानेवारी रोजी पांचगणी या थंड हवेच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या सम्मेलनात महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. अनेक नवोदित कवी आणि कवयित्रींना आपल्या काव्यसादरीकरणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या अद्वितीय आणि ऐतिहासिक कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून ही उदंड प्रतिसाद मिळत आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9921297001 / 9922409358 या नंबर वर संपर्क साधू शकता.