६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)
प्रभादेवी केंद्रातून ‘मिशन व्हिक्टरी’ तर गिरगाव केंद्रातून ‘फक्त एकदा वळून बघ’ प्रथम
६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रभादेवी, मुंबई केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘मिशन व्हिक्टरी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बृहन्मुंबई पोलीस कल्याण, मुंबई या संस्थेच्या ‘इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तर गिरगाव केंद्रातून अश्वघोष आर्टस अॅण्ड कल्चर फोरम, मुंबई या संस्थेच्या ‘फक्त एकदा वळून बघ’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान, कळंबोली या संस्थेच्या ‘सखाराम बाईंडर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही केंद्रांतून दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे प्रभादेवी, मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे :- मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या ‘काठपदर’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम – चेतन किंजलकर (नाटक – इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क), द्वितीय – अजित भगत (नाटक – मिशन व्हिक्टरी), प्रकाश योजना प्रथम – श्याम चव्हाण (नाटक – काठपदर), द्वितीय – भुषण देसाई (नाटक – एक्सपायरी डेट), नेपथ्य प्रथम – सचिन गोताड (नाटक – काठपदर), द्वितीय – प्रदीप पाटील (नाटक – इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क), रंगभूषा प्रथम – अमोद जोशी (नाटक – इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क), द्वितीय – जयवंत सातोसकर (नाटक – मिशन व्हिक्टरी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक निलेश भैद (नाटक – मिशन व्हिक्टरी) व दर्शना रसाळ (नाटक – काठपदर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे कोमल साळवे (नाटक – इव्होल्युशन ए क्वेश्चन मार्क), दीपाली बडेकर (नाटक – मुंबई कोणाची), वैष्णवी देशमुख (नाटक – मिशन व्हिक्टरी), प्रणया संदेश (नाटक – तिचं काय चुकलं), इषा कार्लेकर (नाटक – रिलेशन), कपील जोशी (नाटक – एक्सपायरी डेट), सिध्दार्थ प्रतिभावंत (नाटक – मुंबई कोणाची), संतोष पालव (नाटक – अर्धी मस्ती अर्धा डाँग). विरेंद्र साळवी (नाटक – तुम्हाला कसं जमतं), तेजस जाधव (नाटक – इन सर्च ऑफ)
दि. २८ नोव्हेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत रविंद्र नाटय मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. रमेश भिडे, श्री. संजय कुळकर्णी आणि श्रीमती विनिता पिंपळखरे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे गिरगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे :- मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, मुंबई या संस्थेच्या ‘संगीता फिरोज फडके’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम – बुध्ददास कदम (नाटक – सखाराम बाईंडर), द्वितीय – महेंद्र दिवेकर (नाटक – फक्त एकदा वळून बघ), प्रकाश योजना प्रथम – श्याम चव्हाण (नाटक – फक्त एकदा वळून बघ), द्वितीय – संजय तोडणकर (नाटक – सखाराम बाईंडर), नेपथ्य – प्रथम – रविंद्र वाडकर (नाटक – फक्त एकदा वळून बघ) द्वितीय – चारुदत्त वैद्य (नाटक – सखाराम बाईंडर), रंगभूषा प्रथम – अनिल कासकर (नाटक – फक्त एकदा वळून बघ), द्वितीय – उदयराज तांगडी (नाटक – सखाराम बाईंडर ) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक विद्याधर नामपल्ली (नाटक – सखाराम बाईंडर) व विभूती सावंत (नाटक – विकेटकिपर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शिवकांता सुतार (नाटक – सखाराम बाईंडर), दिपाली जाधव (नाटक – सखाराम बाईंडर), स्वस्तिकी जोशी (नाटक – एका उत्तराची कहाणी), वनमाला वेन्दे (नाटक – चलो एक बार फिरसे), सोनल आजगावकर (नाटक – संगिता फिरोज फडके), अरुण कदम (नाटक – अखेर ती वेळ आलीय), किरण पाटील (नाटक – घंटानाद), डॉ. प्रविण फरांदे (नाटक – जा खेळायला पळ), पंकज दिवेकर (नाटक – फक्त एकदा वळून बघ), महेंद्र कुरघोडे (नाटक – संगीता फिरोज फडके)
दि. ९ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सुरेश पवार, श्रीमती कमल हवळे आणि श्री. अनंत सुतार यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.