Home सामाजिक “पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन” आयोजित पहिल्या जनरल सभेला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद

“पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन” आयोजित पहिल्या जनरल सभेला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

“पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन” आयोजित पहिल्या जनरल सभेला मुबंईत उत्स्फूर्त प्रतिसाद

 


(दिशा महाराष्ट्राची / ठाणे – उदय दणदणे)


 

पाटपन्हाळे सामाजिक फाऊंडेशनची पहिली जनरल सभा पाटपन्हाळे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अरविंद चव्हाण तसेच गावातील प्रत्येक वाडी मंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ पदाधिकारी त्याच प्रमाणे गावातील सर्व वरिष्ठ मंडळी व बहुसंख्य तरुणांच्या उपस्थितीत नुकतीच रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी दामोदर हॉल (सर्व्हिस लीग) परळ मुबंई येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावात सर्व जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. पाटपन्हाळे गावची ग्रामपंचायत ही संपूर्ण गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी आणि तालुक्यातील दोन नंबरची श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. परंतु गावामध्ये पाहिजे तशी विकासात्मक कामे होतं नाहीत. परिणामी गावातील बहुतांश तरुण वर्ग आपले शैक्षणिक शिक्षण झाल्यावर आपल्या उदरनिर्वाह साठी मुंबई, पुण्या सारख्या शहराकडे वळत असल्यामुळे आणि आपल्या नोकरी व्यवसायातून गावाकडे पाहिजे तसा वेळ देता येत नसल्यामुळे फक्त सणासुदीला गावी जाणे येणे होत असते.

गाव हे आपली जन्मभूमी आपली नाळ आपल्या जन्मभुमीकडे घट्टपणे बांधली गेली आहे हे शहरात स्थायिक झालेले तरूण पिढी विसरलेली नाही. मागील काही महिन्यांपूर्वी गावतील काही तरुण पिढी एकत्र येत गावच्या भौतिक परिस्थितीचा महत्वपूर्ण अभ्यास करून भविष्याचा वेध घेत गावात पाणी प्रश्न, रस्ते, दिवाबत्ती, रोजगार, आरोग्य अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करून आपलं गाव सर्व सुख सोयी, सुविधा युक्त विकासात्मक दृष्टीने प्रगती पथावर राहावं यासाठी गावात सक्षम अशी एखादी सामजिक संघटन असावे यावर एकमत होऊन “पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन” नियोजित संस्थेच्या वतीने गावातील सर्व तरुणांना एकत्रित करून गाव ते मुंबई पातळीवर ग्रामस्थांची मिटींग घेऊन ग्रामस्थांना एक संघटित होण्याचे महत्त्व पटवून दिले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः पाटपन्हाळे प्रीमियर लीगने पाठिंबा दर्शवला.

याच अनुषंगाने “पाटपन्हाळे सामाजिक फाऊंडेशने महत्वपूर्ण निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणूक २०२२ दरम्यान ओबीसी आरक्षण असल्यामुळे सर्व गावाने आणि तरुणांनी आपल्या गावातील भूमीपुत्राला प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला त्यात “पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन आणि पीपीएलने महत्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण गावाने ही निवडणूक जिंकली. फाउंडेशन मधील सर्वांचा उत्साह वाढला. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी मुबंईत पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन ची पहिली जनरल सभा आयोजित करण्यात आली होती.

सदर सभेमध्ये “पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन”च्या ध्येय धोरणांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने फाऊंडेशनची कमिटी नेमणे, नियमावली तयार करणे त्याचबरोबर फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. सर्व तरुण मंडळी व वरिष्ठ मंडळी यांनी “पाटपन्हाळे सामाजिक फाउंडेशन” च्या वाढीसाठी मार्गदर्शन केले. सर्वांनी केलेले मार्गदर्शन आणि दिलेली साथ ही गावासाठी आणि नियोजित संस्थेसासाठी खूप मोलाची आहे. सदर सभेत सर्वांनी जोमाने गावासाठी योगदान देऊया अशी वचनबद्ध शपथ घेण्यात आली.

Related Posts

Leave a Comment